आर्थिकमुख्यपान

शेअर बाजारात विक्रम, IPO मार्केटमध्ये तेजी.

सध्या शेअर बाजारात तेजी आहे. बुधवारी प्रथमच निफ्टी50 निर्देशांक 20,000 च्या वर बंद झाला. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना आयपीओ मार्केटमध्ये पैसे कमवण्याची चांगली संधी आहे. 7,000 कोटींहून अधिक किमतीचे IPO येत्या काही दिवसांत बाजारात दाखल होणार आहेत. या आठवड्यात 4,673 कोटी रुपयांचे IPO खुले होत आहेत तर 3,000 कोटी रुपयांचे इश्यू पुढील आठवड्यात बाजारात येतील. झॅगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेस आणि समही हॉटेसचे इश्यू आज खुले झाले असून आरआर केबलचा आयपीओ बुधवारी खुला झाला. त्याचप्रमाणे कोडी टेक्नोलॅब आणि यात्रा ऑनलाइनचे आयपीओही या आठवड्यात येणार आहेत.

पुढील आठवड्यात सिग्नेचर ग्लोबल, अपडेटर सर्व्हिसेस, साई सिल्क आणि वैभव ज्वेलर्सचे आयपीओ बाजारात येतील. शेअर बाजारातील तेजीमुळे कंपन्यांचा आत्मविश्वास वाढला असून कंपन्या आयपीओ आणत असल्याचे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. बुधवारी निफ्टी 20,070 अंकांवर बंद झाला. प्रथमच तो 20,000 च्या वर बंद झाला आहे. सेन्सेक्स सलग नवव्या दिवशीही तेजीसह बंद झाला. गेल्या नऊ दिवसांत दोन्ही निर्देशांकात चार टक्क्यांनी वाढ झाली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!