भारतमहाराष्ट्रमुख्य पानमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

डॉ रखमाबाई, पहिल्या भारतीय महिला व्यवसायिक डॉक्टर!

रखमाबाई राऊत पहिली भारतीय महिला जिने वैद्यकीय शिक्षण घेऊन वैद्यकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम केलं
आळशी आणि कुटुंबाच्या जीवावर जगणाऱ्या नवऱ्या सोबत संसार करायला जाण्या ऐवजी मी सहा महिने तुरुंगात जाणे पसंत करीन असं ठणकावून सांगणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे डॉ रखमाबाई राऊत.
स्वतःच्या संपत्तीत आपल्या घरी अनेक वर्ष काम करणाऱ्या व्यक्तींना ही हिस्सा देण्याचे मृत्यू पत्रात लिहून जाणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे डॉ रखमाबाई राऊत
मॅक्समुलर (विचारवंत ), टेनिसन, (सुप्रसिद्ध कवि ) पंडित नेहरू, पंडिता रमाबाई या आणि अश्या कित्येक विदुषीशी संपर्क आलेल्या व्यक्तीचे नाव आहे डॉ रखमाबाई राऊत
अस्पृश्यासाठी मुंबई मधील गावदेवी मंदिर खुले करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे डॉ रखमाबाई राऊत.
हिंद कैसर म्हणजे आजचा भारतरत्न प्रतिच्या पुरस्काराने सन्मानित केलेल्या व्यक्तीचे नाव आहे रखमाबाई राऊत
भारतात नर्सिंग शिक्षणाचा पाया रचनाऱ्या व्यक्तीचे नाव आहे डॉ रखमाबाई राऊत
वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी मिळाल्यावर विदेशात चांगल्या पगाराची नौकरी आणि पद मिळत असताना ते सोडून मला माझ्या देशातील माता भगिनीची सेवा आणि जागृती करायची आहे, हे सांगून विदेशातून भारतात येऊन महाराष्ट्र, सुरत आणि कच्छ मध्ये 60 वर्ष वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तीचे नाव डॉ रखमाबाई राऊत आहे.
अंधश्रद्धा, सनातनी वृत्ती आणि भेदाभेदाच्या विरोधात असणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे डॉ रखमाबाई राऊत.
25 डिसेंबर हा डॉ रखमाबाई राऊत यांचा स्मृतिदिन आहे, त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन.
भारत आणि महाराष्ट्राने मात्र या कर्तृत्वान विद्रोही महिलेची दखल घेतलेली नाही हा करंटेपणा आहे.
डॉ रखमाबाई : एक आर्त हे मोहिनी वर्दे यांनी लिहिलेले चरित्र आहे, जे प्रत्येकाने वाचावे असे आहे, मुली आणि महिलानी तर नक्की वाचावे ही विनंती

किरण सोनावणे, पत्रकार
9922666607

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!