महाराष्ट्रमुख्य पानमुख्यपान

सकल मुस्लिम समाज मराठा आरक्षण मिळे पर्यंत सोबत…सय्यद सलीम ,,,मराठा आरक्षण सोबत मुस्लिम आरक्षण बाबतीत ही मराठा योद्धा मनोज दादा जंरागे यांनी लक्ष दयावे…..!शेख निजाम,

मागील अनेक वर्षापासून मराठा समाजाला व मराठा समाजातील गरजवंत मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात मागणी होत होती त्यानुसार अनेक आंदोलने होत होती माननीय मनोज जरांगे पाटील यांचे नेतृत्वामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणे संदर्भात जन आंदोलन मोठ्या प्रमाणात होत असून माननीय राज्य शासनाने ही सदरील आंदोलनांची दखल घेऊन मराठा आरक्षण देण्यासंदर्भात हालचाली सुरू केलेले आहेत परंतु मराठा आरक्षण मिळेपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेली आहे याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आश्वासनांची विहित मुदतीत पूर्तता करण्यासाठी दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी सकल मराठा समाजाच्या माध्यमातून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णायक इशारा सभेचे आयोजन पाटील मैदान बायपास बीड येथे करण्यात आले होते यावेळी माननीय जरांगे पाटील यांना सकल मुस्लिम समाजातर्फे मराठा आरक्षणासंदर्भात संपूर्णपणे पाठिंबा देण्यात आला व सभे साठी ग्रामीण भागातून आलेल्या सर्वा साठी पिण्याच्या पाणी बॉटल व नाश्ता ची सोय उपलब्ध केली होती यावेळी बीड नगरीत आगमनानिमित्त माननीय मनोज जरांगे पाटील यांचे सकल मुस्लिम समाजातर्फे स्वागत माजी आमदार सय्यद सलीम साहेब, शेख निजाम जैनुद्दीन शहर प्रमुख शिवसेना ,जावेद भैय्या कुरेशी समाजसेवक,काझी मकदुम,अब्दुल वकील सर , अस्लम अनवरी , खालिद फारुखी, शेख अमर जैनुद्दीन ,खय्युम इनामदार, मोमीन जुबेर, हाफिज अश्फाक,सादेक सिद्धीकी,शेख पाशा,सय्यद फहीम,अब्दुल खदिर,शेख अखलाक, मौलाना मोसिन, उलेमा इक्राम व अनेक मान्यवर उपस्थित होते

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!