RAC प्रवाशांसाठी रेल्वेकडून मोठा निर्णय….

सगळ्या बाबींचा विचार लक्षात घेता असा निर्णय घेण्यात आला आहे की AC क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या आरएसी प्रवाशांना (एसी चेअर कार वगळता) आता ब्लँकेट, बेडशीट आणि टॉवेल, उशीसह संपूर्ण बेड रोल किट देण्यात येईल. नुकतेच रेल्वे बोर्डाकडून सर्व विभागीय रेल्वे आणि आयआरसीटीसीच्या सीएमडीला पत्र पाठवण्यात आले आहे. आता आरएसी प्रवाशांनाही वेगवेगळे बेडरोल देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सर्वांना समान सुविधा…
एसी क्लासच्या प्रवासासाठी आरएसी प्रवाशांकडून वसूल करण्यात येणाऱ्या भाड्यात बेडरोल चार्जेसचा समावेश असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे आता आरएसी प्रवाशांसाठी लिनन आणि संपूर्ण बेडरोल किटची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरएसी सीट कुठे असते?
बाजूच्या खालच्या बर्थवर आरएसी बर्थची व्यवस्था करण्यात आली असते. यामध्ये एकाच बर्थवर दोन प्रवाशांचे बुकिंग केले जाते. ट्रेनमध्ये कोणतीही सीट रिकामी राहिल्यास त्यांची बर्थ कन्फर्म होण्याची शक्यता असतेय. हे शक्य नसेल तर दोन्ही प्रवाशांच्या प्रवास निदान चांगला व्हावा, याचीदेखील काळजी घेतली जाते. त्यामुळे अनेकदा कन्फर्म तिकीट नाही मिळालं तर निदान प्रवास नीट होण्याकडे रेल्वेने लक्ष दिल्याचं या निर्णयावरुन दिसून येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत