नळदुर्ग शहरात भिमराव आंबेडकर यांचे फटाक्यांची आतिषबाजी व फुलाची उधळण करीत करण्यात आले स्वागत.

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग या ऐतिहासिक शहरात
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव यशवंतराव आंबेडकर यांचे नळदुर्ग शहरात . फटाक्याची अतिषबाजी फुलाची उधळण करीत जंगी स्वागत करण्यात आले . यावेळी नळदुर्ग येथील बौध्दाचार्य तथा पत्रकार यानी भरगच्च तयारी करत भिमराव यशवंतराव आंबेडकर यांचे नळदुर्ग या ऐतिहासिक शहरात प्रथमच आगमनानिमीत जंगी स्वागत केले
यावेळी डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इग्लीश मेडीयम स्कुल चे मुख्य प्रवर्तक तथा संस्थापक मारुती खारवे रिपाइंचे उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे अरुण लोखंडे, केंद्रीय शिक्षक बाळासाहेब बागडे , आर एस गायकवाड सह आस पास परिसरातील बौद्ध उपासकानी तोबा गर्दी केली होती . यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे समता सैनिक दलाचे सैनिक राजरत्न बनसोडे योगेश सुरवसे यांच्या सह अनेकानी भिमराव आंबेडकर यांना मानवंदना दिली .
परंडा येथे बौद्ध संस्काराचे महाविहार बनविण्यात आले त्याचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी भिमराव आंबेडकर राष्ट्रीय हायवे वरून जात आसताना नळदुर्ग या ऐतिहसिक शहराला धावती भेट दिली . यावेळी उपस्थित बौद्ध उपासकानी भिमराव आंबेडकर यांना प्रत्यक्ष भेट घेतली म्हणून नागरीकांना मनस्वी आनंद झाला . यावेळी शहरातील सचिन बनसोडे , राजेश बनसोडे , अमर बनसोडे ,
तुषार गायकवाड , सिद्धांत बनसोडे ,शाम नागिले , गोविंद भंडारे सह उपासक मोठया संख्येने उपस्थित होते .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत