टोयाटो ग्लांझा या चारचाकीने तिघांना चिरडले, सैन्य अधिकाऱ्यासह तीनजणांचा मृत्यू.

भंडाराजवळील खुर्शिपार येथे रात्री ९.३० वाजताच्या सुमारास वेगाने आलेल्या टोयाटो ग्लांझा या चारचाकी वाहनाने दोन दुचाकींना एकाच वेळी धडक दिली. या भयानक अपघातात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
एका सैन्य अधिकाऱ्याचा मृतांमध्ये समावेश आहे. नागेश्वर बालपांडे, वय ३४, रा. सातोना, हरगोविंद क्षीरसागर, वय ४५ रा. पाहुणी, विनोद भोंदे, वय ४७ रा. मोहदुरा यांचा अपघात मृत्यू झाला. नागेश्वर बालपांडे हे बेलगाम येथे सैन्यदलात कार्यरत असून ते सुट्टीवर गावाकडे आले होते. या अपघातात चारचाकी वाहनातील दोघे गंभीर असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत