महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

मेणबत्ती तयार करण्याच्या कारखान्यात सहा महिला कामगारांचा होरपळून मृत्यू

पिंपरी  चिंचवड येथीलतळवडेमध्ये ‘स्पार्कल’ मेणबत्ती तयार करणाऱ्या कारखान्यात शुक्रवारी आग लागून सहा महिला कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. कारखान्याच्या मालकासह नऊ महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांपैकी चार महिलांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पूनम अभयकुमार मिश्रा (३८, रा. तळवडे) असे मृत्युमुखी पडलेल्या एका महिलेचे नाव आहे. जखमींमध्ये कारखान्याचा मालक शरद सुतार (वय ४५) याच्यासह अपेक्षा अमोल तोरणे (वय १८), प्रियंका अमोल यादव (वय ३२), उषा सीताराम पाडवे (वय ४०) आदी १० जणांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्मिशामक दलाला दुपारी पावणेतीनच्या सुमारास आगीची माहिती मिळाली. काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले.

तळवडे रेडझोनमध्ये जोतिबा मंदिरामागे पत्र्याच्या शेडमध्ये एक गुंठा जागेत केकवरील ‘स्पार्कल’ मेणबत्ती बनविण्याचा कारखाना आहे. शरद सुतार यांनी भाड्याने घेतलेल्या या कारखान्यात १६ महिला काम करीत होत्या. अडीचच्या सुमारास अचानक भडका उडून मोठा स्फोट झाला. काही महिलांनी जिवाच्या आकांताने बाहेर धाव घेतली. मात्र, या भीषण स्फोटात सहा महिला शेडच्या आतमध्येच अडकल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर बाहेर धाव घेतलेल्या महिलाही गंभीररीत्या भाजल्या.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!