RBI ची मोठी कारवाई, SBI नंतर ‘या’ ३ बँकांना दंड.

नियमांचे काटेकोर पालन न केल्यास रिझर्व्ह बँकेकडून वेळोवेळी बँकांवर दंड आकारला जातो. अलीकडेच सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या SBI बँकेला कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर RBI ने तीन सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. यावेळी आरबीआयने सारस्वत सहकारी बँक लिमिटेड, बसेन कॅथोलिक सहकारी बँक लिमिटेड आणि राजकोट नागरी सहकारी बँक लिमिटेड यांना दंड ठोठावला आहे.
सारस्वत सहकारी बँकेने बीआर कायद्यातील तरतुदी आणि त्याअंतर्गत जारी केलेल्या आरबीआयच्या निर्देशांचे उल्लंघन केले आहे. बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या तरतुदी आणि आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने सारस्वत सहकारी बँक लिमिटेड मुंबईला २३ लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला.
याशिवाय कलम २० च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल महाराष्ट्रातील वसईमधील बसेन कॅथोलिक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला २५ लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. बसेन कॅथोलिक सहकारी बँक तिच्या मालकीच्या एका संचालक/फर्मला अनेक असुरक्षित कर्जे दिल्याबद्दल दोषी आढळली आहे. रिझर्व्ह बँकेने ‘ठेवीवरील व्याजदर’ यासंदर्भात आरबीआयने जारी केलेल्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल राजकोट नागरी सहकारी बँक लिमिटेडला १३ लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत