राष्ट्रपतींच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी देण्यात येणाऱ्या 2023 च्या राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण

आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी देण्यात येणाऱ्या 2023 च्या राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे. दरवर्षी आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनाचं औचित्य साधून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिव्यांग व्यक्ती तसंच दिव्यांगाच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्यांना हे पुरस्कार प्रदान केले जातात.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीनं नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथं हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. शाश्वत विकासाची उद्दीष्टं साध्य करण्यासाठी दिव्यांगजनांच्या साथीनं संयुक्त कृती असा यावर्षीच्या जागतिक दिव्यांगजन दिनाचा मुख्य विषय आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत