मनोज जरांगेची आज जालन्यात जाहीर सभा.

मनोज जरांगे पाटील यांची १ डिसेंबर रोजी जालना शहरात पांजरा पोळ मैदानावर १ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जाहीर सभा होणार असून या सभेसाठी १० लाख मराठा समाज बांधव उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात येत आहे. सभेपूर्वी शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅली दरम्यान विविध समाज बांधवांकडून मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत होणार आहे.
या ठिकाणी मोठी तयारी मराठा समन्वयकांनी केली आहे. ७० ते ८० एकराच्या मैदानावरती ही सभा होणार असून मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी १४० जेसीबींद्वारे त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव होणार आहे. १०१ उखळी तोफा वाजविण्यात येणार असून, शहरात चाळीस हजार स्केअर फुटाची वेगवेगळी होर्डिंग लावण्यात येणार आहेत. सभास्थळी मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी दहा क्विंटलचा शंभर फुटाचा हार देखील तयार करण्यात येणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत