“राज्य रस्ते विकास महामंडळाचे ववस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार लवकरच राजकारणात”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखालील पायाभूत सुविधांशी संबंधित वॅार रुमचे सल्लागार व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे ववस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार हे लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहेत. नांदेड अथवा हिंगोली मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता वर्तविली जाते.
मोपलवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांच्या निकटवरर्तीयांकडून सांगण्यात आले. पुढील आठवड्यात सुरू होणारे हिवाळी अधिवेशन संपल्यावर ते सरकारी पद सोडणार आहेत. कोणतीही तांत्रिक बाब येऊ नये यासाठी त्यांनी पदाचा राजीनामा सादर केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत