
‘डब्ल्यूयूएचओ’ची निरीक्षणे…
जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, चीनमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी बालकांमध्ये ‘एच९एन२’, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि इन्फ्लूएंझा फ्लूच्या वाढत्या प्रकरणांसह अनेक संसर्गजन्य श्वसनरोगांची लक्षणे आढळली आहेत.
चीनमधील बालकांमध्ये ‘एच ९एन२’ (एव्हियन इन्फ्लुएंझा व्हायरस) आणि श्वसनविकार यांचा उद्रेक झाला असल्याने कोरोनासारखाच या आजारांचा प्रसार होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या – आजारांचा भारताला धोका कमी असून केंद्र सरकारचे याकडे बारकाईने लक्ष असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. या आजारांमुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्यास लढा देण्यास तयार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत