एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने ऐन दिवाळीच्या गर्दी हंगामात केली १० टक्के भाडेवाढ

राज्यात गेल्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य लोक हैराण झाले आहेत. त्यानंतर आता त्यामध्ये आणखी एका दरवाढीची भर पडली आहे. एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने ऐन दिवाळीच्या गर्दी हंगामात १० टक्के भाडेवाढ केली आहे.
एसटी महामंडळाने परिवर्तनशील लवचिक भाडेवाढीच्या धोरणानुसार दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवासातील प्रति टप्पा १० टक्केप्रमाणे गाड्यांच्या तिकिटात वाढ केली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत सामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली आहे. मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासून ही भाडेवाढ लागू झाली असून ती पुढील २० दिवस म्हणजेच २८ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील.
दिवाळीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी महामंडळाने १० टक्के भाडेवाढीचा निर्णय घेतला. मंगळवारपासून (ता. ७) ही दरवाढ लागू होणार असून, २७ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. या नवीन दरानुसार आता छत्रपती संभाजीनगर ते पुणे हे प्रवास भाडे ५५५ तर छत्रपती संभाजीनगर ते मुंबई हे भाडे ९१५ रुपये असणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत