महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

प्रवाशांनो लक्ष द्या! पुढील तीन दिवस मोनोरेलच्या वेळापत्रकात बदल

मुंबई: 23/11/2023

तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कारणास्तव मुंबई मोनोरेलमध्ये २३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत मुंबई मोनोरेलच्या वडाळा ते चेंबूर दरम्यानच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. वडाळा ते चेंबूर दरम्यानच्या मार्गिकेवरील सेवा ही दुपारी २ वाजेपर्यंत खंडीत राहिल.
तर, दुपारी २ नंतर वडाळा ते चेंबूर दरम्यान दर एक तासाच्या अंतराने मोनोरेल सेवा सुरू असेल. वडाळा ते संत गाडगे महाराज चौक दरम्यानच्या मार्गिकेवरील सेवा नियमित वेळापत्रकानुसार कार्यरत राहणार आहे. मुंबई मोनोरेलच्या प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मोनोरेल प्रशासनाने प्रवाशांची माफी मागितली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!