महाराष्ट्रमुख्यपान

रमाई आवास घरकुल योजनेतील एक ही लाभार्थी वंचित राहाणार नाही नगर प्रशासनाचा दिलासा.

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या मध्यस्ती नंतर उपोषण मागे

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग शहरातील शासकीय जागेवर राहणाऱ्या कुटूंबियाच्या घर जागेची नगरपरिषद दप्तरी नोंद करुन प्रधानमंञी आवास योजना, रमाई आवास योजनेचा लाभ मिळावे या करिता नगरपरिषद कार्यालयसमोर वसंतनगर, दुर्गानगर, इंदिरानगर, बौध्दनगर, भिमनगर, डॉ आंबेडकर नगर येथील नागरिकांनी आमरण उपोषण सुरु केले होते परंतू लाभार्थांना स्वतःच्या नावे जागा नसल्याने रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी विलंब होत होता अनेक वर्ष झाली शासकीय जागेवर पत्र्याचे छप्पर व दगड मातीचे घर करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत . येवढा पाठ पुरावा करून पण नगर परिषद या अतिक्रमण धारकांची दखल घेतली नाही म्हणून १६ नोहेंबर २०२३ पासून
नळदुर्ग येथे नगर परिषदे समोर अमरण उपोषण सुरु करण्यात आले हे अमरण उपोषण कल्पनाताई गायकवाड पत्रकार दादासाहेब बनसोडे माजी नगरसेविका क्षमाताई राठोड यांच्या नेतृत्वाखाली १०० ते २०० नागरीकासह हे उपोषण करण्यात आले एकुण १८ लाभार्थी अमरण उपोषणास बसले तर काहीनी माघार घेतली दोन दिवसा नंतर उपोषण कर्ते दादासाहेब बनसोडे यांची प्रकृती खालावली बि पी लो आणी शुगर लो मुळे तब्येत बिघडली त्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालयात हालविण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले सतत चार दिवस चार उपोषण चालु होते यावेळी डॉ सुरेंद्र मडके डॉ जीडगे डॉ आदम शेख , परिचारीका बिरंजे , शिंदे , मसतुद अदिनी उपचार देण्यास सुरुवात केली .
गेल्या पन्नास वर्षांपासून शासकिय जागेवर कब्जे वहिवटीनुसार राहणाऱ्या कुटूंबाच्या घरजागेची नगरपरिषद कार्यालयात नोंद करून
रमाई आवास घरकुल योजने पासून एक ही नागरीक वंचित राहाणार नाही यांची पुर्ण दक्षता नगर परिषद घेणार शिवाय सर्व्हे नंबर २९ मधील नागरीकांचे सर्व्हेक्षण झाले आसल्याचे पत्रकात म्हटले आहे .
नगर परिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार व कार्यालयीन अधिक्षक दिपक कांबळे यांचे लेखी अश्वासन आणी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या मध्यस्ती मुळे भिमनगर बुद्धनगर डॉ आंबेडकर नगर मधील शासकीय जागेवर राहात आसलेल्या लाभार्थांचा प्रश्न मार्गी लागल्याने चौथ्या दिवशी हे अमरण उपोषण मागे घेण्यात आले . यावेळी शिवसेनेचे कमलाकर काका चव्हाण काँग्रेसचे पांडू पुदाले शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके भाजपाचे संजय बताले अदिजन उपस्थित होते .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!