गेट वे ऑफ इंडिया जवळ समुद्रात कचरा टाकणा-याला आकारण्यात येईल मोठा दंड.

अखेर जलप्रदुषण करणाऱ्या नागरीकांवर स्वच्छतेसाठी मुंबई महापालिकेने घेतला ठोस निर्णय. गेट वे ऑफ इंडिया जवळ समुद्रात कचरा टाकून अस्वच्छता केल्यास कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. गेट वे ऑफ इंडिया या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी समुद्रात कचरा टाकणा-या व्यक्तीवर पालिकेने १० हजार रुपये दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.
मुंबईतील समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. सार्वजनिक ठिकाणी कचरा, डेब्रिज टाकून मुंबई अस्वच्छ करू नका असे पालिकेकडून सातत्याने आवाहन केले जाते आहे. मात्र यानंतरही समुद्र किनारी, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून परिसर अस्वच्छ केला जातो असल्याने. मुंबई महापालिकेला ठोस निर्णय घ्यावा लागला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत