वाशिमचा सिकंदर शेखने पटकावली महाराष्ट्र केसरी किताबाची मानाची गदा.

सहासष्ठावी वरीष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धा नुकत्याच पुण्यात पार पडल्या. या स्पर्धेत 840 कुस्तीपटूसह अकराशे जणांनी सहभाग घेतला होता. 66वी वरीष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धाफुलगाव इथल्या सैनिकी शाळेच्या मैदानावर 7 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत पार पडली.
मूळचा वाशिमचा असणारा मात्र कोल्हापुरात सराव करणारा सिकंदर शेख यानं महाराष्ट्र केसरी किताबाची मानाची गदा पटकावली. अंतिम फेरी त्याने गतविजेत्या शिवराज राक्षेला अवघ्या 22 सेकंदात झोळी डावावर चितपट केलं. ही स्पर्धा 57 ते 110 अशा वजनी गटात माती आणि गादी विभागात पार पडली. शासनाच्या वतीनं प्रथम क्रमांकास 60, व्दितीय कमांकास 55 तर तृतीय क्रमांकास 50 हजार रूपयांचे मानधन देण्यात येणार येणार आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत