देश

४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी उद्या होणार.

तेलंगण, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या चार राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी उद्या होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून दहा वाजेपर्यंत मतदानाचा पहिला कल समजू शकेल. तेलंगणमध्ये ४९ केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. शांततामय वातावरणात निर्विघ्नपणे मतमोजणी व्हावी यासाठी प्रशासनानं सर्वत्र तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून दहा वाजेपर्यंत मतदानाचा पहिला कल समजू शकेल. तेलंगणमध्ये ४९ केंद्रांवर मतमोजणी होणार आहे.

राज्यात ११९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सुमारे ७१ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. राजस्थानमध्ये १९९ जागांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी प्रक्रिया ३६ केंद्रांवर होईल.मध्य प्रदेशात २३० जागांसाठी दोन हजार ५३३ उमेदवार रिंगणात असून त्यापैकी २५२ महिला आहेत. छत्तीसगढमध्ये विधानसभेच्या ९० जागांसाठी दोन टप्प्यात निवडणूक झाली.

छत्तीसगढमधल्या रायपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातल्या सर्व मतदान केंद्रांवर महिला कर्मचाऱ्यांनी मतदानाचं व्यवस्थापन केलं होतं. मतदानाच्या कामकाजाचं महिलांनी नियोजन करणारा हा देशातला पहिलाच विधानसभा मतदारसंघ ठरला आहे.मिझोरममध्ये उद्याऐवजी सोमवारी मतमोजणी होणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!