
आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत होणार आहे. कोलकाता इथल्या ईडन गार्डन्स मैदानावर दुपारी दोन वाजता या सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेतल्या सात सामन्यांमधील विजयांसह भारत गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दरम्यान या क्रिकेट स्पर्धेत काल ऑस्ट्रेलियानं इंग्लंडवर विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळं डकवर्थ लुईसच्या नियमानुसार न्यूझीलंडवर मात करत पाकिस्तानचा संघ विजयी ठरला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत