आर्थिकप.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपान

दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची लूट! खाजगी प्रवासी बसचे भाडे दुप्पट

पुण्याहून दररोज सुमारे पाचशेहून अधिक खाजगी बस महाराष्ट्राच्या विविध भागांत जातात. या व्यतिरिक्त मुंबईहून येणाऱ्या पाचशे खाजगी बस पुण्यातून पुढे मार्गस्थ होतात. पुण्यातून जाणाऱ्या प्रवाशांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रवाशांची संख्या अधिक असते. दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी असते. प्रवाशांची संख्या वाढण्याच्या काळात बसचे भाडे वाढविण्याचे प्रकार केले जातात. दिवाळीच्या तोंडावर आता खासगी बसचालकांनी भाडे दुपटीहून अधिक वाढविले आहे. यामुळे प्रवाशांना मोठा भुर्दंड बसत आहे.
दिवाळीनिमित्त पुण्यातून मूळ गावी जाणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांची संख्या मोठी असते. यामुळे या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह खाजगी वाहतुकीला मोठी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन खाजगी प्रवासी बसमालकांनी प्रवाशांची लूट सुरू केली आहे. बसमालकांनी दिवाळीच्या काळासाठी दुप्पट भाडे आकारण्यास सुरुवात केली आहे. मात्र, याप्रकरणी खासगी बसच्या संघटनेने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) बोट दाखविले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!