
चीनमध्ये हांगझोऊ इथं सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत १० सुवर्ण,१२ रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह एकूण ३५ पदके जिंकली आहेत.आज भारताच्या खात्यात आणखी १७ पदकांची भर पडली. महिलांच्या पॅरा कॅनोइंग केएल २ प्रकारात प्राची यादवनं आजच्या दिवसातलं पहिलं सुवर्ण पदक जिंकलं.पुरुषांच्या थाळी फेकीत भारताच्या खेळाडूंनी तीनही पदकं जिंकली.यादव यानं सुवर्ण, योगेश कथुनिया यानं रौप्य आणि मुथुराजा यानं कांस्यपदक पटकावलं.शरथ मकानहळ्ळी शंकरप्पाने पुरुषांच्या ५००० मीटर-टी-१३ प्रकारात तर अंकुर धामा यानं ५००० मीटर-टी-११ प्रकारात सुवर्णपदक जिंकलं.१५०० मीटर टी४६ प्रकारात प्रमोद बिजार्निया यानं रौप्य आणि राकेश भैरा यानं कांस्य पदक पकटावलं.रुबीना फ्रान्सिस हीनं महिलांच्या १० मीटर पिस्टल प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली.पुरुषांच्या पॉवरलिफ्टिंगमध्ये ६५ किलो वजनी अशोक यानं कांस्य पदक पटकावलं. रवी रोंगली यानं पुरुषांच्या गोळाफेकीत एफ ४० प्रकारात रौप्यपदक, खंडेलवाल यानं पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल एसएच वन प्रकारात रौप्य तर मनीष नरवालनं कांस्यपदकाची कमाई केली.अजय कुमार यानं पुरुषांच्या ४०० मीटर शर्यतीत टी-६४ प्रकारात रौप्यपदक पटकावलं.एकता भियान हीनं एफ-२३ गटात महिलांच्या पॅरा क्लब थ्रोमध्ये आणि पुरुषांच्या व्हीएल २ प्रकारात गजेंद्र सिंग यानं कांस्य पदकाची कमाई केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत