बोधी वृक्षाच्या फांदीच नाशिक महापालिकेच्या बुध्द स्मारकाच्या प्रांगणात रोपण

तथागत भगवान गौतम बुध्दांना ज्या वृक्षाखाली ज्ञान मिळाले त्या बोधी वृक्षाच्या फांदीच काल नाशिक महापालिकेच्या बुध्द स्मारकाच्या प्रांगणात रोपण करण्यात आलं.राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभाग आणि शांती दूत चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार,नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे,या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष तसचं राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन त्याचप्रमाणे श्रीलंका येथील बोधी वृक्षाचे प्रमुख हेमरत्न नायक थेरो,श्रीलंकेचे बुध्दशासन, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विदुर नायके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थीत होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला दुरदृश्य प्रणालीव्दारे शुभेच्छा दिल्या.यावेळी बोधी वृक्षाच्या फांदीची परीसरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.बौध्द उपासनेनुसार महाबोधी वृक्षाचे रोपण करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत