निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर त्यात देवेंद्र फडणवीस यांना नक्कीच सुवर्णपदक मिळेल ! – रोहित पवारांचा टोला

फडणवीस ज्याला आशीर्वाद म्हणतात, तो आशीर्वाद नसून सत्तेचा गैरवापर करत केलेली कपटी कारस्थानं !

अकलूज : लोकसभा 2024 च्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला असून जागोजागी जाहीर सभांच आयोजन करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अकलूजमधील एका प्रचारसभेत बोलताना “माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहत नाही” असं विधान केले होते. या विधानावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी फडणवीसांवर खोचक शब्दात टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस ज्याला आशीर्वाद म्हणतात, तो आशीर्वाद नसून सत्तेचा गैरवापर करत केलेली कपटी कारस्थानं आहेत, असं ते म्हणाले. एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

“खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर त्यात देवेंद्र फडणवीस यांना नक्कीच सुवर्णपदक मिळेल. आज ते ज्याला ईश्वराचा आशीर्वाद म्हणत आहेत, तो ईश्वाराचा आशीर्वाद नसून सत्तेचा गैरवापर करत केलेली कपटी कारस्थानं आहेत”, अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस तुम्ही कुणाला येडं बनवता? अस म्हणत ईश्वराचा आशीर्वाद कुणाला आहे, हे ४ जूनला स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!