भारतमहाराष्ट्र

अमली पदार्थ प्रकरणात बी. जी. शेखर यांचाही हात; आ. फारुक शहा यांचा आरोप

धुळे – नाशिक जिल्ह्यातील अमली पदार्थ प्रकरणात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांचाही हात आहे, असा आरोप आमदार फारूक शहा यांनी शनिवारी रात्री केला.

 एका विकास कामाच्या उद्घाटनानंतर आमदार शहा यांनी ही प्रतिक्रिया दिली. वाढत्या गुन्हेगारीविरुद्ध मागील विधीमंडळ अधिवेशनावेळी आपण आंदोलन केले होते. त्यावेळी महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन तत्कालीन गृहमंत्र्यांनी दिले होते.परंतु, अद्यापही चौकशी सुरू करण्यात आलेली नाही. संबंधित प्रकरणांची चौकशी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली होती, त्यांनी कोणतीच कार्यवाही न केल्याने पुढील आठवड्यात गृहमंत्र्यांना भेटून महानिरीक्षकांची तक्रार करणार असल्याचे आमदार शहा यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील अमली पदार्थ प्रकरणातही बी. जी. शेखर पाटील यांचा हात असल्याच्या तक्रारी आपणास प्राप्त झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!