महाराष्ट्र

नाशिकच्या येवला तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ

सध्या नाशिकच्या येवला तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. नगरसुल इथं मध्यरात्रीच्या दरम्यान दरोडा पडला. दरोडेखोरांच्या मारहाणीत 10 ते 11 जण जखमी झालेत. जखमींमध्ये महिलांचाही समावेश आहे. जखमींवर येवल्यातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दरोड्या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. अंगुलगावच्‍या लांडखोर परिसरातील दत्तू जाधव यांनी मका, कांदा विकून आलेल्या पैशांवर विहिरीचे काम सुरू केले. विहीर कामगारांना मंगळवारी सुमारे साठ हजार रुपये देण्याचा वायदा केला होता. रात्री सुमारे दीड ते दोन वाजेच्या दरम्यान हा दरोडा पडला. पाच ते सहा दरोडेखोरांनी जाधव या वस्तीवरील घरात दरोडा टाकून दत्तू जाधव यांच्या घरातील सुमारे ६० हजारावर रोख रक्कमेवर डल्ला मारला. दत्तू जाधव यांना पलंगाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. घरातील इतर सदस्य लग्नानिमित्ताने बाहेरगावी गेल्याने मोठा अनर्थ टळला. आठ दिवसात अंगुलगाव येथे दरोडेखोरांनी घातलेला हा दुसरा दरोडा आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!