महाराष्ट्रराजकीय

भाजप आमदाराच्या पत्नीवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरण उघडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप आमदाराच्या पत्नीसह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बीडमध्ये भाजप आमदाराच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदाराच्या पत्नीसह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या एका ज्येष्ठ आमदाराच्या पत्नीचे नाव पुढे आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच आमदाराच्या पत्नीवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटते. आमदाराच्या पत्नीवर आदिवासी पारधी शेतकरी कुटुंबाला धमकावल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश धस यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टी तालुक्यातील वाळुंज येथील आदिवासी पारधी शेतकरी कुटुंबाला धमकावल्याच्या आरोपावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नीचा सहभाग असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आष्टी पोलिसात अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा गुन्हा खोटा असून, राजकीय दबावामुळे दाखल करण्यात आला आहे. वेळ आल्यावर मी माध्यमांशी बोलेन, असे आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!