मुंबईच्या दादर पश्चिमेत कोहिनूर इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग.

मुंबईच्या दादर पश्चिमेत कोहिनूर इमारती मध्ये मध्यरात्री 1 चा सुमारास चौथ्या मजल्यावर आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन तब्बल एक तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
सुदैवाने या आगीमध्ये कुठल्याही जीवितहानी झालेली नसून, कोहिनूर इमारतीच्या पार्किंग मध्ये पार्क केलेल्या 16 ते 17 गाड्या जळून खाक झाल्या आहेत.स्थानिकांच्या आरोप आहे की, कंत्राटदाराकडून नियमांच उल्लंघन करून गाड्यांची पार्किंग केली जाते त्यामुळे ही आग लागली. दरम्यान आग कशामुळे लागली या संदर्भात अधिक तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत