कायदे विषयकनिवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

निवडणुका EVM मशीन वर होणार; आमच्या शंकांचं निरसन झालं आहे – सुप्रीम कोर्टाचे निर्देश.

नवी दिल्ली : साऱ्या देशाच लक्ष लागून असलेल्या EVM बद्दलचा याचिकेवर काल सुनावणी झाली. देशात सर्वत्र EVM बद्दल शंका आणि नाराजी आहे, EVM मशीन मध्ये विश्वासार्ह निकाल येत नाही याची अनेक प्रात्यक्षिके, तक्रारी, याचिका करून झाल्या. सुप्रीम कोर्ट यावर काय निकाल देते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सुप्रीम कोर्टाने काल देशातील 2024 च्या लोकसभा निवडणुका या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सवरच होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. सुप्रीम कोर्टात व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) सह इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (EVM) वापरत केलेल्या मतांची संपूर्ण पडताळणी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकांवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने सांगितलं की, ” निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, आम्ही निवडणुकांवर नियंत्रण ठेवत नाही, निवडणूक आयोगाने आमच्या शंका दूर केल्या आहेत”.

न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ताहड यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान सांगितलं की, “आम्ही निवडणुकांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. आम्ही दुसऱ्या घटनात्मक प्राधिकरणाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवू शकत नाही. निवडणूक आयोगाने आमच्या सर्व शंका दूर केल्या आहेत. आम्ही तुमची विचारप्रक्रिया बदलू शकत नाही. आम्ही फक्त संशयाच्या आधारे आदेश जारी करू शकत नाही”.

आम्हाला फक्त स्पष्टीकरण हवं आहे. एक म्हणजे VVPAT मध्ये मायक्रोकंट्रोलर कंट्रोलिंग युनिटमध्ये बसवलेला आहे का? सिम्बॉल लोडिंग युनिट्स किती उपलब्ध आहेत? निवडणूक याचिकांसाठी 30 दिवसांची मर्यादा आहे, त्यामुळे डेटा 45 दिवसांसाठी संग्रहित केला जातो. म्हणून स्टोरेजसाठी कालावधी त्याच प्रकारे वाढवावा लागेल? कंट्रोल युनिट फक्त सील केलेलं आहे की व्हीव्हीपीएटी वेगळे ठेवलं आहे” या महत्त्वाच्या शंका व प्रश्नावर स्पष्टीकरण मिळालं आहे असं कोर्टाने म्हटलं. 

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!