मराठवाडामुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

बुद्धिस्ट फेस्टिवलच्या कार्यालयाचे उद्घाटन

वाळूज औद्योगिक वसाहतीमधील मौजे रांजणगाव शेणपुंजी येथे दिनांक २२ ऑक्टोबर २०२३ रोजी होत असलेल्या बुद्धिस्ट फेस्टिवलच्या कार्यालयाचे उद्घाटन रांजणगावच्या सरपंच योगिताताई महालकर यांच्या हस्ते काल रविवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी करण्यात आले.यावेळी आयोजक अँड. नामदेव सावंत यांनी कार्यक्रमाची संपूर्ण माहिती दिली. यामध्ये पहिल्या सत्रात सकाळी ९:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून भिक्खू संघाची रॅली, १२:०० वाजता मुख्य धम्मदेशना, दुपारी ३:०० वाजता सामूहिक भोजनदान, सायंकाळी ४:०० वाजता डॉ. राजरत्न आंबेडकर यांचा सत्कार व त्यांच्या हस्ते चळवळीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार होणार आहे.कार्यालय उदघाटनाच्यापूर्वी कमळापूर फाटा ते कार्यालय अशी धम्म रॅली ढोल ताशाच्या तालावर वाजत गाजत काढण्यात आली, यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थिीत होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!