5 निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले.;राज्यात भाजपला मोठा धक्का.

नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा मोठा पराभव झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर याठिकाणी महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले. हा भाजपसाठी पर्यायी महायुतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
नांदेडमध्ये नुकतीच सहा बाजार समितीची निवडणुक झाली. याचे निकाल हाती आले आहेत. या ठिकणी ६ पैकी ५ समित्यांवर महाविकास आघाडीने भाजपचा दणदणीत पराभव केला आहे.
मात्र मुखेड बाजार समिती मध्ये भाजपने महाविकास आघाडीचा पराभव केला. या ठिकाणी भाजपने 18 पैकी 12 जागा जिंकल्या. तर दुसरीकडे उमरी बाजार समितीमध्ये 18 पैकी 18 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या.
बीलोलीत बाजार समितीमध्ये 18 पैकी 17 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. कोंडलवाडी बाजार समितीमध्ये 18 पैकी 17 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या . माहुर बाजार समितीमध्ये 18 पैकी 14 महाविकास आघाडीने जिंकल्या.
धक्कादायक निकाल म्हणजे लोहा बाजार समितीत भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गटाचा पराभव झाला. महाविकास आघाडीला या ठिकाणी 18 पैकी 16 जागा मिळाल्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत