पुण्यात मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्याने अपघात; पाच ते सहा वाहनांना उडवलं, एकाचा दुर्दैवी मृत्यू.

पुण्यातील प्रसिद्ध झेड ब्रिजजवळ भरधाव चारचाकी वाहनाने पाच ते सहा वाहनांना तसेच पादचाऱ्यांना उडवल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता केळकर रस्त्यावर घडली. यामध्ये दोन ते तीन दुचाकी आणि एका रिक्षाला धडक देत स्वतः एका पोलला जाऊन धडकला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.
चारचाकी चालकाला सोबत त्याच्या सहकाऱ्याला अटक केली आहे. उमेश हनुमंत वाघमारे (४८) असे वाहन चालकाचे नाव तर नटराज बाबुराव सूर्यवंशी (४४) असे गाडीमालकाचे नाव आहे. या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपी उमेश हनुमंत वाघमारे आणि त्याचा मित्र नटराज हे दोघे दारू पिऊन गाडी चालवत होते. नदी पात्रापासून अलका चौकच्या मार्गावर गाडी आणली असताना बेफाम वेगात चारचाकी अलका चौकाच्या दिशेने घेऊन जात होते. त्यादरम्यान गाडीवरचा त्यांचा ताबा सुटला आणि रस्त्यावर जात असणाऱ्या विश्वनाथ उपादे यांना उडवले. त्यानंतर त्यांनी दोन दुचाकींना धडक दिली. पॅसेंजर असलेल्या एका रिक्षाला धडक दिली. शेवटी एका लाईटच्या पोलाला जाऊन धडकला. यामध्ये पायी चालत जाणाऱ्या विश्वनाथ उपादे यांचा मृत्यू झाला तर दोन ते तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत