धर्म / जात / लिंग / भाषा यांवरून भेदभाव करू नका उपनिबंधकांच्या गृहनिर्माण संस्थांना सूचना.

मुंबई – मुलुंड (प.) येथील शिवसदन सोसायटीमध्ये तृप्ती देवरुखकर यांना जागा नाकारण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबईमध्ये अशाप्रकारे भाषेच्या आधारावर घर, कार्यालयाची जागा नाकारणे अयोग्य, निषेधार्थ आहे. त्यामुळे यातील संबंधित इसमांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी, असे पत्र सोसायटी उपनिबंधकांना खा. मनोज कोटक यांनी दिले होते. या पत्रानंतर उपनिबंधकांनी सर्वच गृहनिर्माण संस्थांना सक्त ताकीद दिली आहे. ‘देशातील कोणत्याही व्यक्तीला गृहनिर्माण संस्थेचा सदस्य होण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे कोणीही धर्म/जात/जमाती/लिंग/भाषा यांवरून भेदभाव करू नये’, अशी ताकीद उपनिबंधकांनी दिली आहे. मुलुंड पश्चिमेला असणाऱ्या एका सोसायटीत तृप्ती देवरुखकर एकबोटे या महिलेला मराठी असल्याच्या कारणावरून ऑफिससाठी जागा नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला होता. याबाबत खा. मनोज कोटक यांनी सोसायटी उपनिबंधकांना पत्र देऊन लक्ष वेधले. मुंबईमध्ये अशाप्रकारे भाषेच्या आधारावर घर, कार्यालयाची जागा नाकारणे अयोग्य, निषेधार्थ आहे. त्यामुळे या इसमांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी, असे पत्र सोसायटी उपनिबंधकांना खा. कोटक यांनी दिले होते. तसेच अशी घटना घडू नये, याकरिता आपल्या परिमंडळ क्षेत्रातील सहकारी गृहनिर्माण संस्थांना परिपत्रकाद्वारे सुस्पष्ट निर्देश द्यावेत व याबाबत केलेली कार्यवाही व इतर उपाययोजनांची माहिती मला कळवावी, असेही कोटक यांनी उपनिबंधकांना दिलेल्या पत्रात म्हटले होते.
उपनिबंधकांची गृहनिर्माण
संस्थांना ताकीद
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २१ चे अवलोकन केले असता, कोणत्याही व्यक्तीला गृहनिर्माण संस्थेचा सदस्य होण्याचा अधिकार दिलेला आहे. सदनिका/दुकान / व्यावसायिक गाळे / कार्यालये इ. सर्व योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून विकत/ भाडेतत्त्वावर घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस त्याच्या धर्म/जात/जमाती/लिंग/भाषा / जन्माचे ठिकाण यांवरून भेदभाव करून सहकारी गृहनिर्माण संस्थेतील जागा नाकारणे बेकायदेशीर आहे.. अशा घटना निदर्शनास आल्यास त्याबाबतची जबाबदारी व्यवस्थापक समितीची असेल. त्यामुळे सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या व्यवस्थापक समितीनी आपापल्या संस्थांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण करावी. भविष्यात उपरोक्त मुद्द्यांवरून भेदभाव, वाद इ. घटना होऊ नयेत, याकरिता संस्थेचे पदाधिकारी, समिती सदस्य व सभासद यांनी दक्षता घ्यावी, अशी ताकीद उपनिबंधक एम. बी. म्हस्के यांनी गृहनिर्माण संस्थांना दिली आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत