निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असलीच पाहिजे; त्यासाठी योग्य ती खबरदारी घ्या..! – सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला खडे बोल

केरळमधील मॉक पोल दरम्यान, चार ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी युनिट्सने भाजपाच्या चिन्हाला अतिरिक्त मत नोंदवल्याचा ॲड. प्रशांत भूषण यांचा दावा.
नवी दिल्ली : निवडणुकांच्या तारखा जवळ येत आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानाची सर्वांना उत्सुकता आहे. कांहीं ठिकाणी तर प्रचार सुध्दा थंडावला आहे. परंतु EVM बद्दल जनतेच्या मनातील संभ्रम आजही कायम आहे. त्याच संदर्भातील ईव्हीएमवरून केलेल्या मतदारांचं क्रॉस व्हेरिकेशन व्हीव्हीपीएटीच्या स्लिपवरून करण्याच्या मागणीच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी ईव्हीएमबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे.
“इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या निर्मात्याला कोणते बटण कोणत्या राजकीय पक्षाला दिले जाणार आहे किंवा कोणते मशीन कोणत्या राज्यात किंवा मतदारसंघात दिले जाणार आहे हे माहित नसतं” असं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मशीन्स आणि त्यांच्या VVPAT (मतदार-व्हेरिफिकेशन पेपर ऑडिट ट्रेल) युनिट्सच्या कार्याबद्दल प्रश्नांची उत्तरे देताना आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाला सांगितले की, “मतदान युनिटमध्ये बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपीएटी युनिट असते, जे मुळात प्रिंटर असते.” मतदानाच्या सात दिवस आधी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत VVPAT मशीनवर पक्षचिन्हाचे फोटो अपलोड केले जातात. त्यात फक्त पक्षाची चिन्हे चिकटवलेली बटणे असतात. जेव्हा एखादं बटण दाबलं जातं, तेव्हा युनिट कंट्रोल युनिटला संदेश पाठवतं, जे VVPAT युनिटला अलर्ट करतं. जे यामधून दाबलेल्या बटणाशी जुळणारे चिन्ह छापते, अशी सविस्तर प्रक्रिया असल्याचे अधिकाऱ्याने सांगितलं.
दरम्यान, याचिकाकर्ता असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सचे वकील प्रशांत भूषण यांनी एका मल्याळम दैनिकातील एका अहवालाचा संदर्भ दिला की बुधवारी केरळमधील मॉक पोल दरम्यान, चार ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी युनिट्सने भाजपाच्या चिन्हाला अतिरिक्त मत नोंदवले गेले. न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. तसंच, हा अहवाल खोटा असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत