महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
रोहित पाटील यांची प्रकृती बिघडली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे युवानेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. रोहित पाटील यांचं सकाळपासून उपोषण सुरु आहे. उपोषणस्थळी रोहित पाटील यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना ताप आल्याने डॉक्टर उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. टेंभू योजनेत तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यातील 17 गावांचा समावेश करा, या मागणीसाठी रोहित पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांचं सकाळपासून उपोषण सुरु आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत