मुंबईकरांना लवकरच म्हाडाची लॉटरी; आचारसंहिते नंतर काढणार १००० घरांची सोडत.

मुंबई: स्वप्न नगरी मुंबई मध्ये हक्काचे घर असण्यासाठी सर्वचजन धडपड करत असतात. मुंबई मध्ये सर्वसामान्यांना घर पाहिजे असेल तर म्हाडा च्या योजना मार्फत मिळू शकते. आत्तापर्यंत लाखो सदनिका म्हाडा ने सर्वसामान्य जनतेला हस्तांतरीत केल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली आचारसंहिता संपल्यानंतर म्हाडाकडून आगामी सोडतीसाठीच्या तयारीला सुरुवात होणार आहे. ज्यानंतर या सोडतीची तारीख जाहीर करण्यात येईल.
म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी नुकतीच यंदाच्या वर्षी सोडतीत सहभागी करण्यात येणाऱ्या घरांची पाहणीसुद्धा केली. प्राथमिक स्तरावरील अंदाजानुसार मुंबई म्हाडाच्या अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटाकडून घरांची वाढती मागणी पाहता 2024 च्या ऑगस्ट महिन्यामध्ये म्हाडाच्या तब्बल 1000 घरांची सोडत काढण्यात येणार आहे.
प्राथमिक अंदाजानुसार 2023 मधील सोडतीतून साधारम 600 घरं 2024 च्या सोडतीमध्ये जोडली जाऊ शकतात. त्यासोबतच गोरेगावमधील बांधकामाधीन प्रकल्पातील घरं, पवई, तुंगा, कन्नमवारनगर अशा ठिकाणच्या घरांचा समावेशही या सोडतीमध्ये असणार आहे. या घरांच्या दरांसंदर्भात अद्याप कोणतीही सविस्तर माहिती समोर येऊ शकलेली नाही. त्यामुळं म्हाडाच्या अधिकृत घोषणेकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत