राहुल गांधी हमालाच्या भूमिकेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी हे आज सकाळी दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर पोहोचले. यावेळी त्यांनी येथील रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या हमालांची भेट घेतली. त्याच्याशी संवाद देखील साधला. राहुल गांधी यांनी यावेळी हमालांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना काम करताना येणाऱ्या अडचणींबाबत माहिती घेतली. गेल्या महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.
दरम्यान यावेळी हमालांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी रेल्वे स्थानकावर सामान देखील उचललं. तसेच राहुल गांधींनी रेल्वे स्टेशनवर पोर्टरचा लाल गणवेश देखील परिधान केल्याचे पहायला मिळाले. दरम्यान राहुल गांधी यांच्या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत