कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिसांना आज देशाची आदरांजली.

कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिसांना आज देश पोलीस स्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहत आहे. १९५९ मध्ये चिनी आक्रमणाचा सामना करत भारतीय सीमेचं रक्षण करताना वीर मरण आलेल्या १० पोलीस कर्मचाऱ्यांच्या शौर्याचं स्मरण या दिनाच्या माध्यमातून केलं जातं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पोलीस स्मृती दिनानिमित्त शहिद पोलीस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. पोलीस कर्मचाऱ्यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये नवी दिल्लीत राष्ट्रीय पोलीस स्मारकाचं राष्ट्रार्पण केलं. पोलीस कर्मचारी अडचणींच्या वेळी नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्य आधारस्तंभ म्हणून भूमिका निभावत असून सर्वांच्या सुरक्षेची काळजी घेतात असं त्यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे. पोलिसांची कामाप्रतिची अचल निष्ठा त्यांच्याविषयीचा आदरभाव वाढवते असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही आज पोलीस स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय पोलीस स्मारक इथं शहिद पोलीस कर्मचाऱ्यांना आदरांजली अर्पण केली.
जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनीही श्रीनगर जवळ झेवानच्या पोलीस स्मारक इथं शहिद पोलीस कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहिली.
नागालँड मध्ये पोलीस महासंचालक रुपीन शर्मा यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस दलातल्या अनेक तुकड्या आणि श्वानपथकानं शहिद पोलिसांना आदरांजली अर्पण केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत