देश-विदेशमुख्यपान

लंडन येथे रामदास आठवले याना २०२३ चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान.

दि. १५. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लंडन मधील भारतीय उच्चायुक्तालयाला नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी लंडन मधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोरासामी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. लंडनमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक आणि भारतीय विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडे आपण प्रयत्न करू असं आश्वासन आठवले यांनी यावेळी दिलं. लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये बाबासाहेबांनी १९२३ मध्ये द प्रॉब्लम ऑफ रुपी हा प्रबंध लिहिला होता. त्या प्रबंधाला आता 100 वर्षे पूर्ण झाली असून त्या निमित्तइथं कार्यक्रमाचं आयोजन करण्याची विनंती आठवले यांनी केली. त्यावेळी लंडन च्या पार्लमेंट मध्ये रामदास आठवले याना २०२३ चे डॉ. बाबासहेब भीमराव आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!