उत्तर भारतीय समाजा तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

( राहुल हंडोरे यांजकडून )
अंबरनाथ दि. 20 एप्रिल
अंबरनाथ पूर्वेला एम आय डी सी विभागातील फंसीपाडा येथे उत्तर भारतीय समाजा तर्फे जयस्वार बौध्द विकास संघ यांचे विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 133 वा जयंती महोत्सव धूम धडाक्यात साजरा साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी बहुजन चळवळीतील अग्रेसर असलेले कवी सुधाकर सरवदे होते.
या प्रसंगी नगरसेवक सचिन पाटील, आंबेडकरी चळवळ पुढे घेऊन जाणारे धनंजय सुर्वे, डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल हंडोरे, महिला समाजसेविका पद्मा इंगळे, प्रा. डॉ. अरुण अहिरराव, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे गणेश भोईर, हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
तसेच उत्तर भारतीय समाजातील डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल शाळेचे संचालक लालजीराम मास्टर जयस्वार, मुख्यध्यापिका पुष्पा गौतम जयस्वार, जनसेवा विकास प्रतिष्ठान सचिव राजकुमार जयस्वार, पंचम जयस्वार, सिकंदर जयस्वार, बौध्द लेणी संवर्धन समितीचे संतोष वाघमारे, पंचशील बुद्ध विहाराचे रामधनी जयस्वार, शहाडचे शिवप्रसाद जयस्वार, आदींनी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महिलासाठी कलम नावाची महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली. युवकांनी संविधान बचाव या विषया वरील पथ नाट्य सादर केले.
जयंती महोत्सव संयोजक त्रिभुवन जयस्वार यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगम जयस्वार, गुड्डू जयस्वार, दिनेश जयस्वार, उदयभान जयस्वार, जानवी जयस्वार, ललिता जयस्वार, रितिका जयस्वार, आम्रपाली जयस्वार, अधित्री जयस्वार आदींनी विशेष परिश्रम घेतले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत