
गोदीया जिल्यातील डांगोली येथे नकली सोने विकणाऱ्या तरुणाची गावकऱ्यांनी हत्या केली आहे. किशोर चुन्नीलाल राठौर वय ३०, रा. गोंडीटोला, कटंगीकला असे मृताचे नाव आहे. तर संदीप मदनलाल ठकरेले (२३) व देवदीप राजेंद्र जैतवार (१८, रा. गोंडीटोला) अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी रावणवाडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
नकली वस्तूंची विक्री करून फसवणूक करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. शिवाय खरे सोन्याचे दागिने असल्याचे भासवत नकली दागिने विक्री करत आहेत.
गोंदिया जिल्ह्यात नकली साहित्य विक्री करणारे गावोगावी फिरत आहेत. यातच तिन लोक सोन्याचे नकली झुंबर घेउन गावात फिरत होते. याची माहिती गावकऱ्याना मिळाली होती. त्यासाठी गावकऱ्यांनी तिघांना अडवत आम्हाला नकली सोने विक्री करून फसवणूक करता; असे म्हणत तिघा तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. यात एकजण ठार झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
सदर घटना डांगोली येथे घडली. किशोर चुन्नीलाल राठौर (वय ३०, रा. गोंडीटोला, कटंगीकला) असे मृताचे नाव आहे. तर संदीप मदनलाल ठकरेले (२३) व देवदीप राजेंद्र जैतवार (१८, रा. गोंडीटोला) अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी रावणवाडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत