आर्थिकमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

२१ सप्टेंबरला पोलिसांच्या घराची लॉटरी निघणार.

गेली अनेक वर्ष हक्काच्या घरांसाठी पोलीस परिवाराचा संघर्ष सुरु होता. येत्या २१ सप्टेंबरला वरळी, नायगांव, डीलाईरोडमधील बीडीडी चाळीतल्या पोलिसांना हक्काचं घर मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी १५ लाखात घरं देण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांच्या लॅाटरीनंतर लगेच घरांचे करार सुरु होणार आहेत.पोलिसांच्या करारानंतर शिंदे-फडणवीसाचं वरळीत जंगी स्वागत होणार आहे.
वरळी बीडीडी चाळ येथील चाळ २२ ते २८, ६४ ते ७४ व ७७ मधील पुनर्विकास प्रकल्पातील लाभार्थींसाठी ही लॉटरी असणार आहे. येत्या २१ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता गुलझारीलाल नंदा सभागृह तिसरा मजला गृहनिर्माण भवन (म्हाडा), कलानगर, वांद्रे येथे RAT पद्धतीने पात्र गाळेधारकांकरीता सदनिका क्रमांक निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!