निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
मतदारांनो एक्झीट पोल वर विश्वास ठेऊ नका!


4 जूनच्या निकालाची प्रतिक्षा करा!
महेंद्र कुंभारे,
संपादक तथा कामगार नेते, भिवंडी.
रविवार दि. 2 जून 2024.
मो.नं. 8888182324
काल 1 जूनला लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान संपले आणि लगेच घाईघाईत सर्व न्युज चँनेलवर एक्झीट पोल धडाधडा यायला सुरूवात झाली. एक नौटंकी तप करायला गेला आणि इथे सर्व देश वासियांना काम धंद्याला लावले. सर्व चँनल्सनी एकसाथ ठरवून एकतर्फी भाजपलाच बहुमत मिळत असल्याच्या बातम्या द्यायला सुरूवात केली. यासाठी काहीतरी पंँकेज मिळाले असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. पण, पित पत्रकारिता केल्याने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला मात्र काळीमा फासला गेला आहे.
लोकसभा निवडणूका जाहीर झाल्यापासूनच निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद राहीली आहे. त्यातच देशातील प्रत्येक राज्यात केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात संतापाची लाट पहायला मिळत होती. राम मंदिर, 370 कलम आणि हिंदु-मुस्लिम वादाला लोकांनी नाकारले. 10 वर्ष सत्ता हातात असूनही नरेंद्र मोदी देशाचा विकास, रोजगार, शिक्षण, आरोग्याच्या सुविधा, महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांना हमीभाव यावर बोलायचे सोडून काँग्रेसच्या नावानेच अजून बोटे मोडायचे काम करीत होते. समाजातील प्रत्येक घटक नरेंद्र मोदी आणि भाजपावर नाराज असताना भाजप "चारसो पार" करणारच कुठून? प्रत्येक राज्यात फटका बसत असताना मतमोजणीच्या दोन दिवस आधी अचानक भाजपची सत्ता येत असल्याचे दाखविणे म्हणजे पत्रकारितेशी द्रोह करण्यासारखेच आहे.
हा सर्व खटाटोप करण्यामागे फार मोठा गेम प्लान असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण, निवडणूक आयोगाने तब्बल 11 दिवसानंतर 1 कोटी 7 लाख मतदान आणि टक्केवारी वाढविली आहे. evm मशिनमध्ये गडबड करून हा टक्का वाढविला आहे . मात्र देशातील सर्व विरोधी पक्षांनी 4 जूनला मतमोजणी करताना evm मशिन्स मधील चोरी पकडण्याची संपुर्ण तयारी केली आहे. त्यामुळे चोरी पकडली गेल्यानंतर रडीचा डाव खेळून जबरदस्तीने सत्ता काबिज करण्याचे षडयंत्र रचले गेले असू शकते. त्याचाच एक भाग म्हणून देशातील प्रत्येक नागरीकाच्या मनावर भाजपचीच सत्ता येत आहे हे बिंबवण्याचा प्रयत्न न्युज चँनेलच्या माध्यमातून केला जात आहे. म्हणून मतदारांनो या न्युज चँनेलच्या एक्झीट पोल कडे लक्ष न देता 4 जूनच्या निकालाची प्रतिक्षा करा. घोडा मैदान जवळच आहे. दुध का दुध पाणी का पाणी हो जायेगा. म्हणून तुर्तास wait & watch.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत