बेलापूर न्यायालयाचे मध्यरात्रीपर्यंत कामकाज; अल्पवयीन गुन्हेगार प्रकरणात दिरंगाई न करता केली कारवाई.

प्रकरण गंभीर व चिंताजनक असल्याची दैनिक जागृत भारत ने तात्काळ दिली होती बातमी.
मुंबई : तुर्भे येथील सामंत विद्यालयासमोर बुधवारी दुपारी पाच ते सहा अल्पवयीन मुलांच्या गटाने दोन अल्पवयीन मुलांना मारहाण केली होती. दैनिक जागृत भारत ने याबाबतचे वृत्त प्रसारित केले होते. यात एकाचा मृत्यू झाला होता, तर दुसरा गंभीर जखमी झाला होता.
या घटनेनंतर एपीएमसी पोलिसांनी त्याच दिवशी सहा अल्पवयीन मुलांना हत्येच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. हे सर्व जण अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्यांना गुरुवारी दुपारी भिवंडी येथील बाल न्यायालयात हजर करण्यासाठी नेले होते. मात्र ताब्यात घेतलेल्यांपैकी विशाल गुलाब बारीया याचे वय २० वर्षे असल्याचे नंतर, त्याच्या जन्मतारखेवरून निष्पन्न झाले.
बेलापूर न्यायालयातील न्या. आवटे पी. पी. यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी मध्यरात्री पाऊण वाजेपर्यंत न्यायालयाचे कामकाज सुरू ठेवून, इतर न्यायालयांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे या न्यायाधीशांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत