मुख्यपान

वरकुटे-मलवडीत पुण्यतिथीनिमित्त गाडगेबाबांना अभिवादन…

वरकुटे मलवडी : वार्ताहर
स्वच्छतेचे जनक,एक निरक्षर लाखों साक्षर या नावाने ज्यांची ओळख सर्वत्र असलेले संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांना त्यांच्या ६७ व्या पुण्यतिथीनिमित्त वरकुटे-मलवडी पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी सरपंच विलास खरात,सेवानिवृत्त पोलिस अधिकारी दत्तात्रय सोनवणे,माजी सरपंच बाळकृष्ण जगताप,माण तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष देवानंद जगताप,भारत अनुसे,तातोबा बनसोडे,उद्योजक अरुण वनवे,बाळासाहेब आटपाडकर राणाप्पा आटपाडकर,दिलीप खरात,आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
वरकुटे-मलवडी ता.माण येथील हनुमान मंदिरात आयोजित केलेल्या गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात दत्तात्रय सोनवणे म्हणाले की, गाडगेबाबांच्या साधी राहणी आणि उच्च विचारसरणीने जनसामान्यांना उच्च शिक्षणाचे दरवाजे खुले केले.समाजातील अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरांवर गाडगेबाबांनी आसूड ओढले.स्वत: निरक्षर असुनही सर्वसामान्यांच्या घरापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवली.स्वच्छतेचे पुरस्कर्ते असलेल्या गाडगेबाबांनी दिनदुबळ्यांचा उद्धार केला.भजन कीर्तनाच्या माध्यमातून गावोगावी फिरून प्रबोधन केले.पत्रकार सिद्धार्थ सरतापे म्हणाले की,स्वच्छता,सुसंस्कृतपणा आणि लोकशिक्षणाचे एक चालतं बोलत विद्यापीठ असलेल्या गाडगेबाबांनी सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मुलनाबरोबर लोकांमध्ये शैक्षणाविषयी जागृती निर्माण केली.एक निरक्षर,लाखो साक्षर असे ज्यांच्या बद्दल बोलले जाते,त्या गाडगेबाबांनी गोरगरिबांना अज्ञान अंध:कारातून बाहेर काढून प्रगतीची वाट दाखवली.रंजल्या गांजलेल्यांची सेवा करुन,देव दगडात नसून माणुसकीतच असल्याचे पटवून सांगितले.याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब आटपाडकर,माजी सरपंच भारत अनुसे यांनीही विचार मांडले.देवानंद जगताप यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.या प्रसंगी महादेव काटकर,मधुकर चव्हाण,मारुती केंगार,बाळासाहेब मिसाळ,एल जे केंगार,चंद्रकांत पिसे,संजय लोखंडे, कुंडलिक अनुसे आदी ग्रामस्थ उपस्थित होते….

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!