देशभीम जयंती 2024महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे…….

♦करोडो भारतीयांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारे एक महान राष्ट्रनिर्माते
♦जगातील सर्वात मोठ्या संसदीय लोकशाही राष्ट्राला परिपूर्ण संविधान देणारे संविधान निर्माते
♦करोडो अस्पृश्यांना समतावादी, मानवतावादी,विज्ञानवादी बौद्ध धम्माची दीक्षा देणारे जागतिक धम्मक्रांतिकारक
♦ओबीसी बांधवांच्या हितासाठी १९५२ साली आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा देणारे एक सच्चे बहुजन उद्धारक
♦ज्यांच्या संकल्पनेतून रिजर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली असे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ
♦स्री,शेतकरी, कामगार ,कष्टकरी यांच्या हितासाठी लढे उभारणारे एक लढवय्ये
♦८ जुलै १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून ज्ञानगंगा लाखो भारतीयां पर्यंत पोहचवून त्यांचे जीवन घडविणारे कृतिशील शिक्षण प्रसारक
♦मूकनायक,बहिष्कृत भारत,जनता,प्रबुद्ध भारत सारखे नियतकालिकांतून प्रबोधनाची अग्नी सतत तेवत ठेवणारे झुंजार पत्रकार, परखड संपादक
♦राज्यघटनेच्या कलम ४५ नुसार १४ वर्षांखालील मुला-मुलींसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे,मोफत व सार्वत्रिक करणारे,त्यातून करोडो विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था निर्माण करणारे एक महान शिक्षण क्रांतिकारक
♦विविध सामाजिक लढे उभारणारे एक लढाऊ समाजक्रांतिकारक
♦२४ तासांपैकी १८-१८ तास अखंड अभ्यास करणारे विद्यार्थ्यांचे आदर्श
♦बुद्धा अँड हिज धम्म,द प्रॉब्लेम ऑफ रुपी,रिहोल्यूशन अँड काउंटर रिहोल्यूशन,हू वेअर शूद्रा? सारखे अनेक विद्ववत्ताप्रचुर ग्रंथ लिखाण करणारे जागतिक ग्रंथकार
♦भारताच्या सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक, धार्मिक,राजकीय,सांस्कृतिक,कृषी,विधी,उद्योग अशा सर्वांगिण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असणारे सच्चे राष्ट्रनिर्माते …….

       अशा युगनायक, महामानव,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना १३३ व्या जयंती निमित्य विनम्र अभिवादन !

@उज्वलकुमार.

आणि शेवटी…..

अंबर नीला,समंदर नीला !
निली तेरी निशाणी है!!
अंबर से उंची,
समंदर से गहरी !!!

बाबा,

आपकी कहानी है

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!