दिनविशेष – शुक्रवार दिनांक 17 मे 2024

आज दि. १७ मे २०२४, बुद्धाब्द २५६७, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, सुक्कवारो, वेसाख मासो, शुक्रवार, वैशाख माहे.
१७ मे १८७७ – रोजी ‘दुष्काळग्रस्त लोकांना मदत करा’ महात्मा ज्योतिबा फुले यांनी सरकारला विनंती पत्र लिहिले.
१७ मे १९२९ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला Constitution of the Government of Bombay Presidency हा ग्रंथ प्रकाशित झाला.
१७ मे १९२९ – रोजी सायमन मंडळाच्या वृत्तांतावर विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समितीच्या प्रतिवृत्तावर स्वाक्षरी न करता आपली स्वतःची मते नि शिफारसी यांची एक भिन्न मतपत्रिका समितीस सादर केली.
१७ मे १९३६ – रोजी कल्याण येथे धम्मांतराच्या जाहीर घोषणेस पाठिंबा देण्याकरिता ठाणे जिल्ह्यातील पूर्व व दक्षिण भागातील अस्पृश्य मानलेल्या समाजाच्या जंगी जाहीर परिषदेत विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आपल्या मातीमोल आयुष्याला सोन्याचे दिवस प्राप्त होण्यासाठीच धम्मांतराची आवश्यकता आहे.”
१७ मे १९३८ – रोजी खोती आंदोलनासंबंधी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खेड, फुरुस व दापोली (रत्नागिरी) येथे दौरा झाला.
१७ मे १९४१ – रोजी परळ, मुंबई येथे लाल चाळ पंचातर्फे इमारत फंडास थैली अर्पण समारंभ विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.
१७ मे १९४१ – रोजी “बुद्ध जयंती आणि तिचे राजकीय महत्त्व” हा अग्रलेख विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनता वृत्तपत्रात लिहिला.
????????????????????????
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत