प्रज्ञावंत विद्यार्थी सत्कार व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन संपन्न

डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंच संस्थापक अध्यक्ष अरुण शेजवळ यांच्या सामाजिक संस्थेच्या वतीने आज प्रज्ञावंत विद्यार्थी सत्कार व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन संपन्न
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा. बोधीकिरण सोनकांबळे जलसंधारण विभाग औरंगाबाद
प्रा.डॉ. सुनिताताई वाघमारे
प्रा. शिवदास म्हसदे
प्रा. डॉ.विनोद राऊत (प्राचार्य ब्रह्मा व्हॅली)
मा.अरुण शेजवळ यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे दीप व धूप प्रज्वलन तसेच पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले
यानंतर प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉ विनोद राऊत यांनी आपल्या मार्गदर्शनात 10 वी 12 नंतर चे विविध अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणात होऊ घातलेले बदल. Bsc dairy Technology,B Tech in agriculture, Bsc in Biotechnology,B.A.M.S, वेटरनरी सायन्स , paramedical courses,BSC nursing,BMLT, Bsc in home science, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA NATA पर्यंटनातील एम बी ए परीक्षा अशा विविध क्षेत्रातील करियर विद्यार्थ्यांनी कसे करावे यावर मार्गदर्शन केले
यानंतर प्रा. सुनिता ताई वाघमारे यांनी आपल्या मार्गदर्शनात
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या
सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मा. मोहनभाऊ अडांगळे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही डॉ बाबासाहेबांची अनेक उदाहरणे देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
मा. बोधी किरण सोनकांबळे यांनी आपल्या मार्गदर्शनात शिक्षणांबरोबर आपल्या आरोग्याविषयी विद्यार्थी व विद्यार्थिनींना सल्ला दिला
तसेच ऍड निलेश सोनवणे ऍड रवींद्र चंद्रमोरे मी आपल्या मनोगतात कायदेविषयक सल्ला विद्यार्थ्यांना दिला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पगारे यांनी केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मा. चंद्रकांत गायकवाड सर,मा.अरुण शेजवळ, मा.सोनुले सर ,मा प्रवीण गांगुर्डे ,मंदाकिनीताई दाणी यांनीयांनी केले. व आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत