योजनेचे आमिष आणि महिलांची लूट !-राजेन्द्र पातोडे


मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणतांना तीन इंजिन सरकारने लोकसभा निवडणुक झालेल्या पिछेहाट साठी केलेली उपाययोजना आहे.आपण अचानक जाहीर केलेल्या योजनेचा लाभार्थी भगिनीना किती भुर्दंड बसेल ह्याचे सोयरसुतक नसलेले सत्ताधारी योजना जाहीर करून मोकळे झाले आणि राज्यात सुरु झाली ‘लूट लो लाडकी बहिण’. कागदपत्र जुळवा जुळव करायला राज्यात गर्दी उसळली आणि सुरू झाली आर्थिक लूट आकडा गेला आहे ६०० रुपये पार.
कार्यवाही झाली फक्त दोन ठिकाणी.मग परत निकष बदल झाले आणि गर्दीत वाढ झाली.कठोर कार्यवाहीचा सरकारचे इशारा खाली मोजला जात नाही, हेच सिद्ध झाले.त्याचे चित्र अकोल्यात खिसे भरून दाखले वाटणारा तलाठी कार्यालयात दिसले. मूर्तिजापूर मध्ये ५०० ते ६०० घेतले जात आहेत.अर्थात खाजगी आणि सरकारी पातळीवर महिलांना १५०० पेक्षा अधिक गमवावे लागत आहेत.
योजना जाहीर करताना त्याची अंमलबजावणी आणि निकष महत्वाचे असतात त्याच बरोबर त्याची एसओपी देखील करावी लागते.मात्र सरकारला चिंता आहे विधानसभेत निवडून येण्याची.कारण लोकसभा निवडणुक मध्ये मविआ आनि महायुती मध्ये केवळ १.३ टक्के मताचा फरक आहे.महायुती कडून डेमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.त्यासाठी महिला भगिनीची लूट होताना सरकारला त्याचे देणे नाही.एकतर ऑनलाईन अर्ज दाखल होत नाहीत, मग ऑफलाईन अर्ज भरले जात आहेत.भरलेल्या लाखो अर्जाची पडताळणी आणि योग्य लाभार्थी निवड कशी व कधी होणार आहे ? ह्याचे काहीही उत्तर सरकारने योजनेच्या शासन निर्णयात दिले नाही. साधारणपणे अजून दीड महिन्यात विधानसभा निवडणुक आचारसंहिता लागू होवू शकते.अजून ३१ जुलै पर्यंत अर्ज घेतले जातील.आलेले लाखो अर्ज छाननी करून लाभार्थी निवड अवघ्या पंधरा दिवसात होणे जवळपास अश्यक्य आहे.
सबब लाडकी बहिण योजना निवडणुक आधी लाडक्या बहिणीच्या पदरात पडणार का हा खरा प्रश्न आहे.
कारण १५ लाख दाजी साठी देण्याचे जाहीर करणारे जुमलेबाज भाजप ह्या सरकार मध्ये आहे.त्यामुळे १५ लाखातील १ टक्का अर्थात दाजीच्या पत्नीला अर्थात सरकारच्या भगिनीला मिळू देतील की पुन्हा अमित शहा महाराष्ट्रात येवून लाडकी बहिण योजना चूनावी जुमला होता ह्याची घोषणा करतील अश्या आशयाचे सोशल मीडिया मिमस् फिरायला लागले आहेत.
राजेन्द्र पातोडे
अकोला
9422160101
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत