महाराष्ट्रमुख्यपान

वंदे सर्वसाधारण ट्रेन येणार.

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन देशातील सर्वसाधन प्रवाशांना परवडेल अशी ट्रेन तयार केली जातेय. सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत रेल्वेकडून सातत्याने चालवली जात आहे. आता सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि किफायतशीर व्हावा, यासाठी लवकरच स्लीपर आणि सामान्य सुविधा असलेली नॉन-एसी वंदे साधारण ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वेने आधीच सांगितले होते. आता या ट्रेनची पहिली झलक समोर आली आहे.
भारतीय रेल्वेने सांगितले होते की, पहिला वंदे साधरण ट्रेन रेक या वर्षाच्या अखेरीस येण्याची अपेक्षा आहे.नव्या ट्रेनचे नाव अद्याप ठरलेले नाही, मात्र तिचे नाव वंदे साधरण किंवा वंदे अंत्योदय असण्याची शक्यता आहे. या गाड्या सर्वसामान्यांच्या सुखकर आणि आरामदायी प्रवासासाठी बनवल्या जातील असं बोललं जातंय.
ही एक नॉन-एसी ट्रेन असेल. परंतु तिचा वेग वंदे भारत सारखा असेल असे सांगितले जात आहे. एक्स्प्रेस गाड्यांचे ऑपरेशन वाढवल्यानंतर भारतीय रेल्वे आता अपग्रेड केलेल्या द्वितीय श्रेणी अनारक्षित आणि द्वितीय श्रेणी 3-स्तरीय स्लीपर कोचसह नवीन ‘वंदे साधारण’ ट्रेन तयार घेऊन येणार आहे.
ही ट्रेन नॉन-एसी असणार आहे. मात्र या ट्रेनचा वेग वंदे भारत प्रमाणेच असेल. या ट्रेनमध्ये 2 सेकंड लगेज, गार्ड आणि अपंगांसाठी फ्रेंडली कोच, 8 सेकेंड क्लास अनरिझर्व्ह कोच आणि 12 सेकंड क्लास 3-टीयर स्लीपर कोच असतील. सर्व डबे नॉन-एसी असतील.
अद्याप ही ट्रेन अधिकृतपणे लॉन्च करण्यात आलेली नाही. मात्र लॉन्च होण्यापूर्वीच या गाडीचा फर्स्ट लूक समोर आलाय. जो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या ट्रेनची खासियत म्हणजे या ट्रेनचं भाडं हे सर्वसामान्यांना परवडेल असं असणार आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये या ट्रेनविषयी खूप उत्सुकता आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!