दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिकसामान्य ज्ञान

दिनविशेष 1 मे 2024

आज दि. १ मे २०२४, बुद्धाब्द २५६७, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, बुधवारो, चेत मासो, बुधवार, चैत्र माहे.

१ मे १९३२ – रोजी लोथियन समितीचे कामकाज संपले. लोथियन समितीने ‘डिप्रेस्ड क्लास म्हणजे अस्पृश्य वर्ग’ हा अर्थ केला. हा विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा विजय होता.

१ मे १९३६ – रोजी वर्धा येथे सेठ जमनालाल बजाज, म. गांधी यांनी सेठ वालचंद हिराचंद यांच्यासह विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन धर्मांतराबद्दल चर्चा केली.

१ मे १९५३ – रोजी भारतीय संविधान दुसरे घटनादुरुस्ती करण्यात आली. या घटना दुरुस्तिद्वारे लोकसभेतील प्रतिनिधींची पुनर्रचना करण्यात आली.

१ मे १९५६ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यसभेच्या सभागृहात भाषिक प्रांतरचनेच्या प्रश्नाविषयी आवेशपूर्ण भाषण केले.

१ मे १९६० – रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त सर्वाँना हार्दिक शुभेच्छा.

१ मे १९६६ – रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दिल्ली येथे पाचवे अधिवेशन कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

१ मे १९७७ – रोजी सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते महाड मधील क्रांती स्तंभाचे उद्घाटन झाले.

१ मे १९७७ – रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यास सहमती दर्शविली व रितसर करण्याची सूचना दिली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!